आमची ओळख

भूमी एन्टरप्राइझेस ही पुण्यातील अग्रणी बांधकाम आणि सिव्हिल काँट्रॅक्टींग संस्था असून २० वर्षाचा बांधकाम क्षेत्रातील सखोल अनुभव आणि ५००+ यशस्वीरित्या पूणात्वास नेलेले बांधकाम प्रकल्प हे या कंपनीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. वचनबद्धता, प्रकल्पांचे पद्धतशीर नियोजन आणि प्रत्येक व्यवहारात ठेवलेली पारदर्शकता ह्या मूल्यांवर आज भूमी कन्स्ट्रक्शन खंबीरपणे उभी आहे.

भूमी कन्स्ट्रक्शनची स्थापना २००० साली झाली असून आज आम्ही टर्न-की सोल्युशनs, सिव्हिल काँट्रॅक्टींग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, इंटेरियर डिझाईनिंग आणि हेरिटेज रिस्टोरेशन या सेवा आमच्या संस्थेमार्फत वितरित करतो.

भूमी एन्टरप्राइझेस महाराष्ट्रातील अनेक प्रमुख प्रदेशांमध्ये कार्यरत असून, आमच्या वचनबद्धतेमुळे आणि प्रकल्पांच्या पद्धतशीर नियोजनामुळे आमचे ग्राहक आमच्याशी दीर्घकाळ व्यावसायिक संबंध टिकवून आहेत. अनुभवी सहयोगी सल्लागार, प्रशिक्षित बांधकाम कर्मचारी आणि जोडीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या मुळेच भूमी एन्टरप्राइझेस नाव आज बांधकाम क्षेत्रात विश्वासू ठरले आहे.

संस्थापकाचा संदेश

“मी नरेंद्र वेलणकर, भूमी एन्टरप्राइझेसचा संस्थापक, भूमीच्या वेबसाईट वर तुमचे स्वागत करतो. भूमी एन्टरप्राइझेस मोठी होण्यामागे आमच्या ग्राहकांचा आणि शुभचिंतकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच आम्ही आधी ग्राहकांशी नाती जोडतो आणि मग त्यांच्या वास्तू बांधतो. २००० साली जेव्हा भूमीला सुरुवात झाली तेव्हापासूनच मी आणि माझी टीम उत्तमतेला प्राधान्य देऊन अत्यंत भक्कम वास्तू बांधत आलो आहोत. आमच्या याच विचारांच्या आणि कामाच्या पद्धतीने आमचे ग्राहक अत्यंत समाधानी असून आमच्याशी दीर्घकाळ नाते टिकवून आहेत.

आम्ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रकल्प पूर्ण केले असून आता आमचे लक्ष्य भारतभर आमची टीम वाढविणे याकडे केंद्रित आहे. वेगवेगळाल्या भौगोलिक ठिकाणी काम करताना, तिकडचे वातावरण, उपलब्ध असलेला कच्चा माल आणि स्थानिक परिस्थितीला अनुसरून आम्ही प्रकल्प बांधतो. या मुळेच आमच्या वास्तू या चिरंतन टिकणाऱ्या आणि वेगळ्या दिसतात.

आमच्या अन्य सेवांव्यतिरिक्त ऐतिहासिक वास्तूंचे नूतनीकरण आणि पुनःनिर्मिती हि भूमीमार्फत वितरित केली जाणारी महत्वाची सेवा. हि सेवा देण्यामागची पार्श्वभूमी म्हणजे मी स्वतः इंडॉलॉजी आणि पुरातत्वशास्त्राचा अभ्यासक असून या विषयात इंजिनीरिंग नंतरचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. या विषयात मी अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये स्वतःचे संशोदनात्मक अहवाल सादर केले आहेत आणि अजूनही करतो. पुरातन वास्तू या आपल्या संस्कृतीचा वारसा असून त्याला पुनर्जीवित करणे यामध्ये आमच्या संपूर्ण टीमला अत्यंत समाधान तर मिळते.

मला विश्वास आहे कि याच विचारांनी आम्ही पुढे चालत राहिलो तर भूमी एन्टरप्राइझेस कन्स्ट्रक्शन क्षेत्रात आपल्या देशाला अत्यंत महत्वाचे योगदान नक्की देईल. धन्यवाद!”

आमची मूल्ये

वचनबद्धता
संघटित कार्य
चिरंतन कार्यपद्धती
लक्ष्य साधक
नैतिकता
पद्धतशीर
विश्वासू

व्हिजन

उत्तम दर्जाचे बांधकाम, वचनबद्धता, गुणवत्तेस पात्र टीम, सक्रिय व्यवस्थापन, प्रत्येक प्रकल्पांचे शिस्तबद्ध नियोजन आणि चोख अंमलबजावणी या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून ग्राहकांच्या संतुष्टीसाठी सतत चांगले काम करत राहणे.

टीम भूमी

नितीन मस्के
प्रोजेक्ट इन्चार्ज
नितीन हे स्वतः सिव्हिल इंजिनिअर असून, बांधकाम क्षेत्रात त्यांना ५+ वर्षांचा सखोल अनुभव आहे. बांधकाम क्षेत्रातील सखोल माहिती, नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि उपयुक्त वापर आणि झोकून देऊन काम करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आमचे ग्राहक त्याच्यासोबत अत्यंत समाधानी असतात. व्यावसायिक आणि औद्योगिक प्रकल्पांची हाताळणी ते अत्यंत पद्धतीशीररित्या करतात.