टर्न-की प्रोजेक्टस

बांधकाम क्षेत्रातील टर्न-की प्रोजेक्टस हाताळण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे अनुभवी टीम आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे. याच २ आधारस्तंभांवर भूमी एन्टरप्राइझेसने गेल्या २० वर्षात अनेक आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण केले. गेल्या २० वर्षाच्या आमच्या वाटचालीमध्ये आम्ही संपूर्ण राज्यभर सहकारी कर्मचारी, तज्ञ सल्लगार तसेच विक्रेत्यांचे एक भक्कम नेटवर्क तयार केले. प्रत्येकाची निवड करताना आम्ही अत्यंत दक्षता पाळून फक्त दर्जेदार आणि प्रमाणित माल विक्रेत्यांचीच निवड केली.

कोणताही टर्न-की प्रकल्प हाताळण्यापूर्वी आम्ही आमच्या ग्राहकांशी सखोल संवाद साधतो. त्याच्या डोक्यातील संकल्पना, त्यांची या प्रकल्पाच्या मागील दृष्टी आम्ही समजावून घेतो. त्यानंतर त्यांच्या डोक्यातील संकल्पनांना आम्ही कागदांवर उतरवून त्यांच्यासमोर एक आराखडा ठेवतो. प्रकल्पाला लागणाऱ्या सर्व मालाची, वेगवेगळ्या छोट्या सेवांची, कामगारांची, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची आणि खर्चाची नोंदणी करून एक अहवाल तयार करतो.

एकदा प्रकल्पास सुरुवात झाल्यावर आमच्या वेगवेगळ्या टीम शेवटपर्यंत एकमेकांशी समन्वय साधून प्रकल्प हाताळतात. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही उत्तमता गाठण्यासाठी पुरेपूर काळजी घेतो. प्रकल्पाचे वेळापत्रक काटेकोर पद्धतीने पाळले जाताना प्रत्येक टप्प्यावर अनुभवी व्यवस्थापकांद्वारे गुणवत्ता नियंत्रण केले जाते.

सिव्हिल काँट्रॅक्टींग

भूमी एन्टरप्राइझेसची सुरुवात मुखतः सिव्हिल काँट्रॅक्टींग या सेवेने झाली. या क्षेत्रतमध्ये आमच्या टीमला सर्वात जास्त अनुभव असून या सेवेमार्फत आम्ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उत्तम दर्जाचे प्रकल्प वितरित केले आहेत. या सेवेअंतर्गत आम्ही निवासी, व्यावसायिक तसेच औद्योगिक प्रकल्पांची उभारणी केली आहे. आमच्या टीमची पात्रता तसेच बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि कच्चामाल निवडताना राखलेली गुणवत्ता या दोनही बाबतीत आम्ही कटाक्षाने लक्ष घालून अत्यंत्य दूरदृष्टीने प्रकल्प पूर्णत्वास नेतो.

बाजारात आलेल्या नवीन तंत्रज्ञानचा आणि उपकरणांचा आमची टीम वेळोवेळी सखोल अभ्यास करते. त्यातील योग्य त्या उपकरणांची आणि तंत्रज्ञानाची निवड करून संपूर्ण टीम ला त्याचे नियमित प्रशिक्षण दिले जाते. उत्तम दर्जाच्या कच्च्यामालाची हाताळणी करताना निवडलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा आणि उपकरणांचा वापर केला जातो. प्रत्येक प्रकल्पाच्या सुरवातीस उत्तमता गाठण्यासाठी या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात.

भूमी एन्टरप्राइझेसमध्ये गांभीर्याने पाळल्या जाणाऱ्या या अंतर्गत योजना आणि मूल्यमापन प्रणालीमुळेच आज भूमी एन्टरप्राइझेस हे फक्त सिविल काँट्रॅक्टींग या सेवेशीच संबंधित नसून, संपूर्ण टर्न-की प्रोजेक्ट हाताळू शकणारे एक विश्वासू नाव झाले आहे. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्यावर आम्ही ग्राहकांसोबत १००% पारदर्शकता,प्रामाणिकता बाळगतो आणि टीमवर्कच्या जोरावर अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे प्रकल्प उभारतो.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी

कुठल्याही बांधकाम प्रकल्पाची सुरुवात हि उत्तम नियोजनाने होते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी हि सेवा प्रकल्पाचे चोख नियोजन करून, प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष घालण्यासाठी आणि त्याची व्यवस्थित नोंद होण्यासाठी अतिशय महत्वाची असते. भूमी एन्टरप्राइझेस येथे या सेवेच्या अंतर्गत आलेल्या प्रकल्पांची आम्ही अतिशय सखोलरीत्या माहिती घेऊन, प्रकल्पाची गरज तसेच प्रकल्पातून साध्य करायच्या गोष्टींचे दस्तऐवजीकरण करतो.

आमची टीम, ग्राहकाच्या प्रकल्पाकडून असलेल्या अपेक्षा, त्याच्या भोवती आखलेला अर्थसंकल्प, ग्राहकांना हवे असलेले डिझाईन हे सर्व जाणून घेते. या प्रकल्पांवर लावलेल्या सर्व टीमची कार्यक्षमता कशी पूर्णपणे वापरता येईल याचाही आढावा घेते. भूमीचा २० वर्षांचा सखोल अनुभव हा आम्ही ग्राहकांच्या हातात देऊन प्रकल्पाचा अंत्यंत प्रभावी आराखडा तयार करतो आणि आमची प्रोजेक्ट मॅनेजर्सची टीम प्रकल्पांवर देखरेखीसाठी लावतो. प्रकल्पावर कार्यरत असलेल्या प्रत्यके टीमशी आम्ही वेळोवेळी समन्वय साधतो, प्रकल्पाला नियमित भेटी देतो आणि त्याचा अहवाल तयार करतो. या सर्व प्रक्रियेतून जाताना आमची टीम ग्राहकाला केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून उत्तमता साधण्यास मदत करते, तांत्रिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी सज्ज करते, बांधकामातील छोट्या-छोट्या चुका टाळण्यास मदत करते आणि संपूर्ण प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याची ग्वाही देते.

इंटेरियर डिझाईनिंग

भूमी एन्टरप्राइझेसची इंटेरीर डिझाईनिंग टीम ग्राहकांना अनन्यसाधारण परंतु अतिशय सुटसुटीत डिझाईनसची अंमलबजावणी करण्यास मदत करते. कोणत्याही ग्राहकाशी दीर्घकाळ नातेसंबंध जोपासण्यावर भूमीचा विश्वास आहे. ग्राहकांचे समाधान हेच भूमीचे यश असून आमच्या इंटेरियर डिझाईन टीम त्याच अनुषंगाने प्रकल्पाची हाताळणी करत असते.

अत्यंत्य लग्झरी पद्धतीचे रेसिडेन्शियल प्रकल्प हाताळणे हे भूमीचे वैशिष्ट. मोठे बंगल्याचे इंटीरियर प्रकल्प आम्ही अतिशय यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. ग्राहकाच्या रोजच्या जागेच्या गरजा, नवीन जीवनशैलीला योग्य अशा सुख-सुविधांचा प्रकल्पामध्ये समावेश करणे आणि ग्राहकांच्या आवडी-निवडीचा विचार करून जागेचे सुशोभन करणे यामुळे आमच्या सर्व प्रकल्पांना ग्राहकांनी उचलून धरले.

ऐतिहासिक वास्तूंचे नूतनीकरण आणि पुनःनिर्मिती

ऐतिहासिक वास्तू म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपले सर्वस्व वेचून निर्माण केलेली अजरामर कलाकृती आहे. अशा वास्तू ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक या सर्व प्रकारेच आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनतात. अशा वास्तुचे जतन करणे म्हणजे राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय एकात्मता, सद्भावना जोपासण्यासाठी केलेले अत्यंत महत्वपूर्ण प्रयत्न.

अशा सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पुरातन वास्तूंचे योग्य नूतनीकरण आणि डागडुजीकरण करण्याचे महत्वाचे कार्य भूमी एन्टरप्राइझेस द्वारे केले जाते. असे प्रकल्प अत्यंत भावनिक संवेदनशीलतेने भूमी कन्स्ट्रक्शन कडून हाताळले जातात. हे प्रकल्प हाती घेताना वास्तू पुन्हा उभारण्यासाठीचे पुरातन आराखडे, नकाशे शोधून, त्यावर अभ्यास करून ते नव्याने बनविले जातात. अशा प्रकल्पासाठी अत्यंत जबाबदार आणि तज्ञ लोकांची टीम भूमी कडे असून, याच्या अनुभव आणि कौशल्याने हे प्रकल्प पूर्णत्वास नेतो. आम्ही मूळ स्थापत्यशास्त्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देतो.अस्तित्वात असलेली वास्तू, पुनः -बांधकामाचा उद्देश, त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा अंदाज घेऊन नियोजित बांधकामासाठी नकाशासह बांधकामाची पूर्वतयारी अमलात आली.

या सेवेसाठी बांधकाम शास्त्राला पूरक तसेच आधारभूत ठरणारे पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणारे तज्ञ आमच्या टीम मध्ये कार्यरत आहेत. आज ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुरातन वास्तूंचे स्थापत्यशास्त्र हे कौशल्य मानले जात असून, अशा प्रकारचे प्रकल्प हाताळण्यासाठी अत्यंत दूरदृष्टी असणारी टीम भूमीने तयार केली आहे.